Tuesday 13 March 2018

पगार विलंबास कारण की ...


आज 13 मार्च अद्यापपर्यंत मुंबईतील शिक्षकांचे व शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत. शिक्षकांचे पगार न झाल्याने गृहकर्ज व इतर हफ्ते थकलेले आहेत, त्यावर आता बँका दंड लावतील. शिक्षक भारतीने मुंबै बँके व शिक्षण विभाग यांच्या विरोधात  उच्च न्यायालयात अभूतपूर्व लढा दिला व 3 जुन 2017 चा शासन निर्णय  दि 9 फेब्रुवारी 2018 रोजी रद्द केला आहे. आमचे  पगार युनियन बँक / राष्ट्रीयकृत बँकेत अदा केले जावेत ही शिक्षकांची रास्त व न्याय मागणी आहे. मुंबईतील शिक्षक जिंकले व सरकार हरले म्हणून शालार्थच्या नावाखाली शिक्षकांचे पगार अदा करण्यास जाणीवपूर्वक उशिर केला जात आहे, शिक्षकांना विनाकारण त्रास दिला जात आहे अशी शिक्षकांची धारणा झाली आहे.

आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री श्रीदेवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उच्च न्यायालयात शिक्षक भारतीच्या व मुंबईच्या शिक्षकांच्या बाजूने लागलेल्या निकालाची आठवण करून दिली, मा. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला पगाराबाबत कार्यवाहीचे आदेश दिलेपरंतू केवळ शिक्षक भारतीचा पगाराच्या लढाईत मुम्बै बँक विरोधात विजय झाला म्हणून निर्णय घेण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. त्याचप्रमाणे शिक्षक भारती पगाराबाबत मुम्बै बँकेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना ज्या शिक्षक परिषद व तथाकथित ज्युनिअर कॉलेजच्या संघटनांच्या नेत्यांनी सरकार व मुम्बै बँक चे ब्रैंड अम्बेसीटर  म्हणून काम केले, मुम्बै बँकेच्या करारावर सह्या केल्या व मुंबईतील तमाम शिक्षकांचा पगार मुम्बै बँकेत ढकलला ते आता शिक्षकभारतीने उच्च न्यायालयात मिळविलेल्या यशाचा दाखला देऊन शिक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचे सांगत आहेत व श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेतपुन्हा  शिक्षकांची दिशाभूल करत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ज्यांना श्रेयाचे राजकारण करायचे आहे, ते त्यांना लखलाभ असो, ते त्यांनी जरूर करावे पण  पण माझ्या शिक्षकांना नाहक त्रास होत असेल व पगारास विलंब होत असेल तर शिक्षक भारती ते कदापि सहन करणार नाही. दि 9 फेब्रुवारीला उच्च न्यायालयाने  मुम्बै बँकेविरोधात दिलेला निर्णय स्वयंस्पष्ट असताना शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यास विलंब केला जात आहे हे न समजण्या इतपत मुंबईतील शिक्षक दुधखुळे  नक्कीच नाही आहेत ही गोष्ट श्रेयवादाचे राजकारण करणाऱ्यांनी जरूर लक्षात घ्यावी.

पगार तर नक्कीच होणार आहेत
न्यायालयाच्या निर्णयामुळे मुम्बै बँकेत पगार टाकल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, पगार कोणत्या बँकेत टाकायचा असा प्रश्न शिक्षण विभाग शिक्षण मंत्र्यांना विचारात आहे, पण त्यांचे लेखी उत्तर अजून न आल्याने शिक्षण विभाग पगार अदा करण्यास विलंब करत आहे. आमदार कपिल पाटील पगार लवकरात लवकर व्हावेत यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत, शासनाला लवकरात लवकर पगाराचा निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. शिक्षक भारती न्यायालयात सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे, पण त्याअगोदर मा. शिक्षणमंत्र्यांनी  पगाराचा आदेश काढला तर शिक्षक भारती व मुंबईतील शिक्षक त्यांचे  खुल्या मानाने स्वागत करेल व जाहीर आभार मानेल.

प्रा. शरद गिरमकर
‌अध्यक्ष, शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट, मुंबई


Monday 5 February 2018

सरकारचे षडयंत्र आणि मुम्बै बँकेचे दबावतंत्र


महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग राज्यातील शिक्षकांचा पगार सध्या ऑनलाइन पद्धतीने शालार्थ वेतन प्रणालीद्वारे अदा करत आहे,तत्पूर्वी हा पगार ऑफलाईन पद्धतीने अदा केला जात असे. सदर शालार्थ प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचे सांगत शिक्षण विभागाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाइन बिले स्वीकारली नाहीत,22 जानेवारी पर्यंत शालार्थ प्रणाली दुरुस्थ करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली गेली नाही,22 जानेवारीला शिक्षण विभागाने शालार्थ  प्रणाली लगेच दुरुस्त होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावरसुद्धा शिक्षण विभागाकडून ऑफलाईन वेतन अदा करावयास लागेल अशा प्रकारच्या कोणत्याही आगाऊ सूचना वित्त विभागाला दिल्या गेल्या नाही,शेवटी महिनाअखेर ऑफलाईन पद्धतीने वेतन बिले स्वीकारण्याची नामुस्की शिक्षण विभागावर आली. मुंबई विभागात  शिक्षण विभागाने हलगर्जीपणाने व जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या परिस्थितिचा फायदा मुंबई बँकेने उठवत ज्या शिक्षकांनी आगतिकतेने व तथाकथित शासन धार्जिण्या  संघटनांच्या दाबावामुळे इच्छा नसताना मुंबई बँकेत खाते उघडले त्या काही  शिक्षकांचे पगार ओव्हर ड्राफ्ट ने 1 तारखेला देण्याची तत्परता दाखवली.आमच्या शिक्षक बंधू,भगिनींना वेळेत पगार मिळाल्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे कारण 2011 पासून आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीच्या अथक प्रयत्नांतून union बँकेसारख्या सर्व सेवा सुविधांनी युक्त राष्ट्रीयकृत बँकेतून दर 1 तारखेला पगार मिळाल्याचा आनंद काय असतो हे मुंबईतील तमाम शिक्षकांनी अनुभवले आहे.परंतु शिक्षण विभागातील काही अधिकारी मुंबई बँकेच्या संगनमताने  शाळा ,महाविद्यालयातील पे बिले जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई बँकेत पगार खाती उघडण्यासाठी जबरदस्ती करत आहेत,मुंबई बँकेत खाते उघडली तरच पगार वेळेत होतील असे धमकावत आहेत.आजही हजारो शिक्षकांची खाती शिक्षक भारतीच्या सरकार व मुंबई बँकेविरोधातील अभूतपूर्व  न्यायालयीन लढ्यामुळे union बँकेत सुरक्षित  असताना अधिकारी व मुंबई बँक ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची दडपशाहीने,हेतुपरस्पर दिशाभूल करत आहे हे निषेदार्ह तर आहेच पण हा  न्यायालयाचा अवमान आहे.शिक्षक बंधू,भगिनींनो या परिस्थितीला दपशाही करणारे सरकार तर जबाबदार आहेच पण शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा कैवार घेतलेल्या ज्या तथाकथित शिक्षक संघटना आझाद मैदानात  आदल्या दिवशी मुंबई बँके विरोधात खोटीनाटी आंदोलने करतात व दुसऱ्या दिवशी मुंबई बँकेच्या कपात चहा पितात,कायम बंदची व दरवर्षी पेपर तापासणीवर बहिष्काराची भाषा करतात व नंतर अचानक बोटचेपी भूमिका घेऊन  माघार घेतात याही तितक्याच जबाबदार आहेत.मित्रांनो शिक्षक भारती बँकेच्या बाबतीत  आपल्या भूमिकेवर ठाम आहे.मा. उच्च न्यायालयाला शिक्षक भारतीची सत्याची व न्यायाची बाजू पटली आहे परंतु सरकार व मुंबई बँकेचे वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहत असून वारंवार पुढची तारीख घेत आहेत.आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल,या महिन्यात पगार थोडे उशिरा होतील,पण जरूर होतील.अधिकारी व मुंबई बँकेच्या भूलथापांना व दडपशाहीला आपण बिलकुल जुमाननार नाही ही खात्री आहे .
धन्यवाद.

अध्यक्ष, शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट, मुंबई

Saturday 20 January 2018

इंसानियत का जनाजा!@पाकिस्तानमधील#निर्भया#


 गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील कसूर नावाच्या शहरातील नागरिक झैनब या निर्भयावर झालेल्या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले,दंगल सदृश वातावरण तयार झाले,संपूर्ण सुसंस्कृत समाजमन हेलावले  गेले .किरण नाझ नावाच्या पाकिस्तानी टीव्हीवरील वृत्त निविदेकेने आपल्या लहान निरागस मुलीला स्टुडिओमध्ये समोर घेऊन 7 वर्षाच्या झैनबवर झालेल्या पाशवी अत्याचाराचे व त्यानंतर तिच्या खूनाचे वर्णन अत्यंत हृदयद्रावक रीतीने केले,या घटनेची जगभर चर्चा झाली,या घटनेचा उल्लेख तिने #इंसानियत का जनाजा# आणि #मासुमियात का खून#असा करून एक प्रकारे माणसामधल्या हैवानाला जगासमोर  अक्षरश: नागड केल.त्या दिवशी किरण नाझ हि फक्त एक वृत्तनिवेदिका म्हणून झैनबवर झालेल्या अत्याचाराची बातमी वाचत नव्हती तर एक सुसंस्कृत आई व मानवतावादी स्त्री आपल्या लहान निरागस मुलीला समोर ठेऊन बेंबीच्या देठापासून ओरडून,आक्रोश करून झैनबवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत होती.या अमानवी जगात तिला वाटणाऱ्या असुरक्षिततेची खंत ती व्यक्त करत होती,तिला सांगायचे होते की पाकिस्तानमध्ये  किंवा जगात इतर ठिकाणी कुठेही मुली,महिला सुरक्षित नाहीत.तिला सांगायचे होते की सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या आजच्या समाजातही स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त एक उपभोगाची वस्तूच आहे मग ती  नवजात जन्मलेले लहान कोवळे बाळ असू द्या,शाळेत जाणारी निरागस विद्यार्थिनी असु द्या,एखादी संसारी स्त्री असू द्या किंवा नातवंडांना गोष्ट सांगणारी एखादी आजी असू द्या.
मग प्रश्न पडतो खरच माणूस हा माणूस राहिला आहे का?समाज कोणताही असुद्या,जात,धर्म,वंश,पंथ,भाषा अगदी कुठल्याही देशाचा असुद्या, माणसातला  हैवान त्याच्या अमानवी कृत्याने सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला व पर्यायाने  मानवतेला हादरे देताना दिसत आहे.
       मग दिल्लीतील निर्भयावर झालेले अत्याचार असतील,कोपर्डीतील छकुलीवर झालेले अत्याचार असतील किंवा काल परवा पाकिस्तानमध्ये मासुम झैनबबरोबर झालेले अमानवी व पाशवी कृत्य असेल, या घटना निषेदार्ह आहेतच पण आपण अशा घटनांचा किती दिवस फक्त  निषेधच करणार आहोत ?
       या घटना साध्यासुध्या नसून या क्रूर व अमानवी घटना माणसातल्या लुप्त होत चाललेल्या माणुसकीला,निरागसतेला, चांगुलपणाला क्रूर व नितीभ्रस्ट मानसिकतेने दिलेले आव्हान आहे.एरवी अशा अप्रिय घटना घडल्या कि यातील क्रूरकरम्याला दोष देताना त्याच्या ठराविक  जात ,धर्म, समाज,प्रदेशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून तथाकथित बुद्धिवादी समाज आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडवताना आपणास दिसतो. हे योग्य कि अयोग्य या वादात न पडता क्रूरकर्मी व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या लोकांना मग ते कोणत्या जातीचे ,धर्माचे ,भाषेचे किंवा कोणत्या देशाचे आहेत याचा विचार न करता ते माणसातील हैवान आहेत हे वेळीच जाणले  पाहिजे.अशा दुष्ठ मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्यासाठी व जागीच ठेचण्यासाठी विवेकी मंडळींनी आपला आवाज बुलंद करून ,सतत जागृत राहून समाजाचे व मानवतेचे अधःपतन रोखले पाहिजे.  
प्रा. शरद गिरमकर
एस.एन.डी.टी.महिला महाविद्यालय,माटुंगा,मुंबई.
9022325620

Sunday 17 December 2017

अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज मधील व इतर पदांना लवकरच मान्यता व पगार मिळणार

*अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांना व इतर वाढीव पदांना लवकरच मान्यता मिळणार*

*शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला अखेर यश*

गेल्या 28 तारखेला शिक्षक भारती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने ज्युनिअर कॉलेज मधील प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन केले होते व मागण्यांचे निवेदन सहाय्यक  शिक्षण उपसंचालक श्री अहिरे यांना दिले होते,त्यानंतर शिक्षण उपसंचालक श्री बी बी चव्हाण यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांना मान्यता देण्याचे काम अंतिम टप्यात असून येत्या 5 दिवसांमध्ये सदर शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढण्यात येतील असे  आश्वासन  शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेजच्या शिष्ठमंडळाला दिले.
ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांना अँप्रोवल बाबतीत काही समस्या असतील तर खालील शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा
*प्रा शरद गिरमकर* 9022325620
 अध्यक्ष
*प्रा ईश्वर आव्हाड*  9870329155
कार्याध्यक्ष
*शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट,मुंबई*

पगार विलंबास कारण की ...

आज 13 मार्च अद्यापपर्यंत मुंबईतील शिक्षकांचे व शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत. शिक्षकांचे पगार न झाल्याने गृहकर्ज व इतर हफ्ते थकलेले...