Monday, 5 February 2018

सरकारचे षडयंत्र आणि मुम्बै बँकेचे दबावतंत्र


महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग राज्यातील शिक्षकांचा पगार सध्या ऑनलाइन पद्धतीने शालार्थ वेतन प्रणालीद्वारे अदा करत आहे,तत्पूर्वी हा पगार ऑफलाईन पद्धतीने अदा केला जात असे. सदर शालार्थ प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचे सांगत शिक्षण विभागाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाइन बिले स्वीकारली नाहीत,22 जानेवारी पर्यंत शालार्थ प्रणाली दुरुस्थ करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली गेली नाही,22 जानेवारीला शिक्षण विभागाने शालार्थ  प्रणाली लगेच दुरुस्त होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावरसुद्धा शिक्षण विभागाकडून ऑफलाईन वेतन अदा करावयास लागेल अशा प्रकारच्या कोणत्याही आगाऊ सूचना वित्त विभागाला दिल्या गेल्या नाही,शेवटी महिनाअखेर ऑफलाईन पद्धतीने वेतन बिले स्वीकारण्याची नामुस्की शिक्षण विभागावर आली. मुंबई विभागात  शिक्षण विभागाने हलगर्जीपणाने व जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या परिस्थितिचा फायदा मुंबई बँकेने उठवत ज्या शिक्षकांनी आगतिकतेने व तथाकथित शासन धार्जिण्या  संघटनांच्या दाबावामुळे इच्छा नसताना मुंबई बँकेत खाते उघडले त्या काही  शिक्षकांचे पगार ओव्हर ड्राफ्ट ने 1 तारखेला देण्याची तत्परता दाखवली.आमच्या शिक्षक बंधू,भगिनींना वेळेत पगार मिळाल्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे कारण 2011 पासून आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीच्या अथक प्रयत्नांतून union बँकेसारख्या सर्व सेवा सुविधांनी युक्त राष्ट्रीयकृत बँकेतून दर 1 तारखेला पगार मिळाल्याचा आनंद काय असतो हे मुंबईतील तमाम शिक्षकांनी अनुभवले आहे.परंतु शिक्षण विभागातील काही अधिकारी मुंबई बँकेच्या संगनमताने  शाळा ,महाविद्यालयातील पे बिले जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई बँकेत पगार खाती उघडण्यासाठी जबरदस्ती करत आहेत,मुंबई बँकेत खाते उघडली तरच पगार वेळेत होतील असे धमकावत आहेत.आजही हजारो शिक्षकांची खाती शिक्षक भारतीच्या सरकार व मुंबई बँकेविरोधातील अभूतपूर्व  न्यायालयीन लढ्यामुळे union बँकेत सुरक्षित  असताना अधिकारी व मुंबई बँक ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची दडपशाहीने,हेतुपरस्पर दिशाभूल करत आहे हे निषेदार्ह तर आहेच पण हा  न्यायालयाचा अवमान आहे.शिक्षक बंधू,भगिनींनो या परिस्थितीला दपशाही करणारे सरकार तर जबाबदार आहेच पण शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा कैवार घेतलेल्या ज्या तथाकथित शिक्षक संघटना आझाद मैदानात  आदल्या दिवशी मुंबई बँके विरोधात खोटीनाटी आंदोलने करतात व दुसऱ्या दिवशी मुंबई बँकेच्या कपात चहा पितात,कायम बंदची व दरवर्षी पेपर तापासणीवर बहिष्काराची भाषा करतात व नंतर अचानक बोटचेपी भूमिका घेऊन  माघार घेतात याही तितक्याच जबाबदार आहेत.मित्रांनो शिक्षक भारती बँकेच्या बाबतीत  आपल्या भूमिकेवर ठाम आहे.मा. उच्च न्यायालयाला शिक्षक भारतीची सत्याची व न्यायाची बाजू पटली आहे परंतु सरकार व मुंबई बँकेचे वकील जाणीवपूर्वक गैरहजर राहत असून वारंवार पुढची तारीख घेत आहेत.आपल्याला थोडा संयम ठेवावा लागेल,या महिन्यात पगार थोडे उशिरा होतील,पण जरूर होतील.अधिकारी व मुंबई बँकेच्या भूलथापांना व दडपशाहीला आपण बिलकुल जुमाननार नाही ही खात्री आहे .
धन्यवाद.

अध्यक्ष, शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट, मुंबई

No comments:

Post a Comment

पगार विलंबास कारण की ...

आज 13 मार्च अद्यापपर्यंत मुंबईतील शिक्षकांचे व शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत. शिक्षकांचे पगार न झाल्याने गृहकर्ज व इतर हफ्ते थकलेले...