गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील कसूर नावाच्या शहरातील नागरिक झैनब या निर्भयावर झालेल्या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले,दंगल सदृश वातावरण तयार झाले,संपूर्ण सुसंस्कृत समाजमन हेलावले गेले .किरण नाझ नावाच्या पाकिस्तानी टीव्हीवरील वृत्त निविदेकेने आपल्या लहान निरागस मुलीला स्टुडिओमध्ये समोर घेऊन 7 वर्षाच्या झैनबवर झालेल्या पाशवी अत्याचाराचे व त्यानंतर तिच्या खूनाचे वर्णन अत्यंत हृदयद्रावक रीतीने केले,या घटनेची जगभर चर्चा झाली,या घटनेचा उल्लेख तिने #इंसानियत का जनाजा# आणि #मासुमियात का खून#असा करून एक प्रकारे माणसामधल्या हैवानाला जगासमोर अक्षरश: नागड केल.त्या दिवशी किरण नाझ हि फक्त एक वृत्तनिवेदिका म्हणून झैनबवर झालेल्या अत्याचाराची बातमी वाचत नव्हती तर एक सुसंस्कृत आई व मानवतावादी स्त्री आपल्या लहान निरागस मुलीला समोर ठेऊन बेंबीच्या देठापासून ओरडून,आक्रोश करून झैनबवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत होती.या अमानवी जगात तिला वाटणाऱ्या असुरक्षिततेची खंत ती व्यक्त करत होती,तिला सांगायचे होते की पाकिस्तानमध्ये किंवा जगात इतर ठिकाणी कुठेही मुली,महिला सुरक्षित नाहीत.तिला सांगायचे होते की सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या आजच्या समाजातही स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त एक उपभोगाची वस्तूच आहे मग ती नवजात जन्मलेले लहान कोवळे बाळ असू द्या,शाळेत जाणारी निरागस विद्यार्थिनी असु द्या,एखादी संसारी स्त्री असू द्या किंवा नातवंडांना गोष्ट सांगणारी एखादी आजी असू द्या.
मग प्रश्न पडतो खरच माणूस हा माणूस राहिला आहे का?समाज कोणताही असुद्या,जात,धर्म,वंश,पंथ,भाषा अगदी कुठल्याही देशाचा असुद्या, माणसातला हैवान त्याच्या अमानवी कृत्याने सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला व पर्यायाने मानवतेला हादरे देताना दिसत आहे.
मग दिल्लीतील निर्भयावर झालेले अत्याचार असतील,कोपर्डीतील छकुलीवर झालेले अत्याचार असतील किंवा काल परवा पाकिस्तानमध्ये मासुम झैनबबरोबर झालेले अमानवी व पाशवी कृत्य असेल, या घटना निषेदार्ह आहेतच पण आपण अशा घटनांचा किती दिवस फक्त निषेधच करणार आहोत ?
या घटना साध्यासुध्या नसून या क्रूर व अमानवी घटना माणसातल्या लुप्त होत चाललेल्या माणुसकीला,निरागसतेला, चांगुलपणाला क्रूर व नितीभ्रस्ट मानसिकतेने दिलेले आव्हान आहे.एरवी अशा अप्रिय घटना घडल्या कि यातील क्रूरकरम्याला दोष देताना त्याच्या ठराविक जात ,धर्म, समाज,प्रदेशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून तथाकथित बुद्धिवादी समाज आपल्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडवताना आपणास दिसतो. हे योग्य कि अयोग्य या वादात न पडता क्रूरकर्मी व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या लोकांना मग ते कोणत्या जातीचे ,धर्माचे ,भाषेचे किंवा कोणत्या देशाचे आहेत याचा विचार न करता ते माणसातील हैवान आहेत हे वेळीच जाणले पाहिजे.अशा दुष्ठ मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्यासाठी व जागीच ठेचण्यासाठी विवेकी मंडळींनी आपला आवाज बुलंद करून ,सतत जागृत राहून समाजाचे व मानवतेचे अधःपतन रोखले पाहिजे.
प्रा. शरद गिरमकर
एस.एन.डी.टी.महिला महाविद्यालय,माटुंगा,मुंबई.
9022325620

अप्रतिम लेख आहे....
ReplyDeleteअप्रतिम लेख आहे....
ReplyDeleteअप्रतिम लेख आहे....
ReplyDeleteअप्रतिम लेख आहे....
ReplyDeleteअभ्यासपूर्ण विवेचन केले आहे सर
ReplyDelete